पिंपळगाव बसवंत: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या निफाड फाटा परिसरात साधेपणाने साजरी करण्यात आली. शिवसेना, युवा सेना पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टनसिंगचे पसलन करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक निर्बंध लादल्याने शहरात कोरोना नियमांचे पालन करत लभडे गल्ली, निफाड फाटा, जुना आग्रारोड, ग्रामपालिका, टॅक्सी, रिक्षा युनियन कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मान्यवरांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरी झाली.
याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते भास्कर बनकर, उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, पं स सदस्य राजेश पाटील, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुजीत मोरे, तालुका सह संपर्कप्रमुख किरण लभडे, तालुका समनव्यक आशिष बागुल, शहर प्रमुख नितीन बनकर, केशव बनकर, कौस्तुभ तळेकर,संदीप भवर कचू सूर्यवंशी, अक्षय घोडके, योगेश लावर, अमोल बिडवे, आदिंसह शिवसेना, युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते, शिवप्रेमी उपस्थित होते.
सायंकाळी महाआरती
शहरात सकाळी फिजिकल डिस्टनसिंगचे पसलन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सायंकाळी महाआरतीने शिवजयंती साजरी साजरी झाली.
राजे ग्रुप मंडळांनेही साधेपणाने साजरी केली.
दरवर्षी लाखो जनसमुदायांच्या उपस्थितीत थाटात साजरा होणारा तिथीनुसार शिवजयंतीचा कार्यक्रम यंदा कोरोना पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा झाला.प्रशासनाने केलेल्या आवाहनास येथील शिवसेना पुरस्कृत राजे ग्रुप मंडळांनी देखील प्रतिसाद दर्शवित साधेपणाने यंदाची शिवजयंती मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्ट्सन्सिंगचे पालन करत साजरी केली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
शिवजयंती पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त व चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.