पिंपळगाव बसवंत: होळी रे होळी पुरणाची पोळी, होली हे, च्या जयघोषात पिंपळगाव बसवंत शहरात होळी पौर्णिमेचा सण कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत साधेपणाने साजरा झाला. शहरात विवीध ठिकाणी होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळसासह कोरोना विषाणूचा नायनाट व्हावा,सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.अशी प्रार्थना व विधिवत पूजा आरती करत होळीस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.
पिंपळगाव शहरातील तुळजाभवानी नगर, परिसरात भव्य दिव्य होळीचे आयोजन करण्यात आले होते. होळी पूजनानंतर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. होळी सणासाठी काढण्यात आलेली भव्य दिव्य रांगोळी व फुलांची आरास होळी सणाचे मुख्य आकर्षण ठरली.
प्रसंगी बाळासाहेब बिडवई, अशोक आहेर, जगन बाविस्कर, परेश बाविस्कर, मनोज सुपेकर, सचिन बाविस्कर, पंकज सुपेकर, बाळा कुरधने, नलिनी बिडवई, अंजना सुपेकर, पुष्पा बाविस्कर, मीरा कुरधने, शीतल बागुल, राधा बाविस्कर, जयश्री बिडवई, राणी सुपेकर, आरती पैठणपगारे, पूजा सुपेकर, पूनम आहेर, शीतल बिडवई, आदींसह परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
होळी सणाची ही प्रथा कालबाह्य….
पिंपळगांव शहरात पूर्वी होळी सणासाठी दारोदारी फिरत होळीसाठी दोन लाकडे व गौरी दिलीच पाहिजे अशी आरोळी ठोकत पारंपरिक वाद्याच्या संगतीत लाकडे गोळा करण्याची परंपरा व त्यातून बाल गोपालाना मिळणारी मजा काही औरच होती. मात्र आजच्या डिजिटल युगात ही परंपरा काहीशी कालबाह्य होताना दिसत आहे. शहरात काही ठिकाणी मोठं मोठ्या भव्य दिव्य होळया उभारण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर निवडक ठिकाणी पर्यावरणाचा विचार करता छोट्या होळया उभारण्यात येऊन पर्यावरण संवर्धन, व प्रदूषण टाळा आदींसह अन्य सामाजिक संदेश देत शहरात होळीचा सण साजरा झाला.