एसटी आगारालाही फटका
पिंपळगाव बसवंत: आशिया खंडात क्रमांक एकचि शेतीविषयक व व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरात वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बुधवारपासून ७ एप्रिल पासून शहरात ५ दिवसाचा लागू केलेल्या जनता करफ्यूला पिंपळगावच्या व्यवसायिकांनी पहिल्याच दिवशी स्वयं स्फूर्तीने १०० टक्के प्रतिसाद दिला. दिवसभर व्यवसायिकांनी पाळलेल्या कडकडीत बंदमुळे पिंपळगावच्या व्यापारी बाजारपेठेत लाखोंची उलाढाल ठप्प होती.
शनिवार रविवार बंद व ५ दिवसीय जनता कर्फ्यू पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिल्याने जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. मात्र रस्त्यावर वावरणाऱ्या वाहनधारक व सैरभैर फिरणाऱ्यांची मात्र दिवसभर गर्दी दिसून आली. वैद्यकीय मेडिकल सेवा सोडून पिंपळगाव शहर परिसरातील मेनरोड, जुना आग्रारोड, निफाडरोड, स्टेट बँकचौक, चिंचखेडरोड, उंबरखेडरोड, आदीं परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत एसटी आगारच्या १२ बसफेऱ्या प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी रद्द करण्यात आल्याने येथील एसटी अगाराला जवळपास २ लाखांचा फटका बसला आहे.
पिंपळगावकराना आवाहन
पिंपळगाव बसवंत शहरात वाढत्या कोरोनचे संक्रमण रोखण्यासाठी शहरात ५ दिवसीय जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपळगावकरांनी कोरोना नियमांचे पालन करत पाच दिवसीय कडकडीत बंद मध्ये सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे
गणेश बनकर, ग्रामपालिका सदस्य पिंपळगाव ब
………….
दंडात्मक कारवाई
शहरातील कोरोना बधितांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात फक्त मेडिकल, व हॉस्पिटल उघडे राहणार असल्याने अत्यावश्यक कामे असेल तरच पिंपळगावकरांनी बाहेर पडावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
भाऊसासाहेब पटारे, पोलीस निरीक्षक पिंपळगाव