माजी आमदार अनिल कदम यांचे शेतकऱ्यांना आवाहन
पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यात महावितरण विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या भवती धाडसत्र सुरु केले आहे. विजबिले भरा, अन्यथा आपल्या रोहित्र, विद्युतपंप व लाईट कट करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याने शेतकऱ्यांचे वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडसत्र महावितरणने थांबविण्याची सध्यातरी गरज आहे.
निफाड तालुक्यातील कुठेही वीज पुरवठा खंडित करण्यास कुणी महावितरणचे अधिकारी कर्मचारी आल्यास थेट या ८८८८००७७११ या क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांचे सामाजिक माध्यमांद्वारे शेतकरी वर्गास केले आहे.
नाशिक जिल्ह्यासह द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात गेली पाच ते सात वर्षांपासून अस्मानी, अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब, गहु पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच मागीलवर्षी नवीन कोरोना रोगामुळे जगासह देशात थैमान घातल्याचे लक्षात येत आहे. महावितरण विभागाने शेतकऱ्यांच्या भवती धाडसत्र सुरु केले आहे. विजबिले भरा, अन्यथा आपल्या रोहित्र, विद्युतपंप व लाईट कट करण्याची मोहिम हाती घेतल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाने निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडसत्र तातडीने थांबवा, त्याचबरोबर तालुक्यातील कुठेही वीज पुरवठा खंडित करण्यास कुणी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आल्यास शेतकऱ्यांनी थेट ८८८८००७७११ या क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी केले.