पिंपळगाव बसवंत: शहरात गेल्या काही दिवसांपासून मंदावलेली कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेतर्फे शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांसह विना मास्क वावरणाऱ्या २०० हून अधिक नागरिकांवर कारवाई बडगा उगारीत जवळपास ७ हजारांचा दंड वसूल केला.
कोरोना विषाणूपासून बचाव व खबरदारी म्हणून पिंपळगाव शहर परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रतिष्ठाने शनिवार, रविवार पूर्णता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशन्वये पिंपळगाव ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले असताना शहर व परिसरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकासह विना मास्क व विना रुमाल फिरणाऱ्या नागरिकांवर पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू कारवाई सुरू करण्यात येऊन २०० हून अधिक नागरिकांकडून जवळपास ७हजारांचा दंड वसुल करण्यात आला. कारवाई प्रसंगी ग्रामपालिकेचे ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.
मास्क लावूनचा बाहेर पडा, अन्यथा दंड भरा
पिंपळगाव बसवंत शहर परिसरात विना मास्क बाहेर फिरणाऱ्या नागरिकांकडून दंडात्मक कारवाईस सुरुवात झाल्याने पिंपळगावकरांनी मास्क लावूनच बाहेर पडा, नाहीतर दंड भरा. खरबदारी म्हणून काळजी घेण्याचे आवाहन देखील ग्रामपंचायततर्फे करण्यात आले आहे.