पिंपळगाव बसवंत – जिल्ह्यातील महत्वाची व्यापारी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात वाढत्या कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने संबंध राज्यभर लागू केलेल्या शनिवार, रविवार विकएन्ड लॅाकडाऊनला पिंपळगावकरांसह व्यवसायिकांनी कडकडतीत बंद पाळत संमिश्र प्रतिसाद दिला.
शहरात वाढता कोरोनाचा प्रसार, प्रचार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बुधवारपासून ७ एप्रिल पासून ते रविवार दि.११ पर्यंत शहरभर ५ दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. पाच दिवसीय जनता कर्फ्यू व विकएन्ड पार्श्वभूमीवर पिंपळगाव शहर व्यवसायिकांनी पाच दिवसीय पाळलेल्या कडकडीत बंदमुळे पिंपळगावच्या व्यापारी बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.
जिल्ह्यातील महत्वाची व्यापारी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लागू करण्यात आलेल्या शनिवार, रविवार विकएन्डसह स्थानिक प्रशासनाने रविवारपर्यंत लागू केलेल्या ५ दिवसीय जनता कर्फ्युला पिंपळगाव बसवंत येथील व्यवसायिकांनी आपआपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवीत प्रतिसाद दर्शविला असला तरी शनिवार, रविवार विकएन्ड वगळता रस्त्यावर वावरणाऱ्या वाहनधारक व सैरभैर फिरणाऱ्यांची मात्र गेल्या तीन दिवस रस्त्यावर गर्दी दिसून आली. वैद्यकीय मेडिकल सेवा सोडून पिंपळगाव शहर परिसरातील मेनरोड, जुना आग्रारोड, निफाडरोड, स्टेट बँकचौक, चिंचखेडरोड, उंबरखेडरोड, आदीं परिसरात व्यवसायिकांनी कडकडीत बंद पाळण्यात आला.
विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
पिंपळगाव बसवंत शहरात विकएन्ड व जनता कर्फ्यू पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारीत दंडात्मक कारवाई केली.
…………….