पिंपळगाव बसवंत – वंचित बहुजन आघाडीच्या पिंपळगाव बसवंत शहराध्यक्षपदी विकी सुरेश गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. आघाडीचे तालुकाध्यक्ष रमेश गवळी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत गांगुर्डे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
पिंपळगाव परिसरात गांगुर्डे यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. महाविद्यालयीन जीवनातच गांगुर्डे त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या पिंपळगाव बसवंत शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आघाडीचे तालुका सचिव संगेश गांगुर्डे, तालुका गणप्रमुख स्वप्निल गांगुर्डे, देवेंद्र गांगुर्डे, सुदेश गांगुर्डे, दिलीप रोहम, सिद्धार्थ पवार, तेजस गांगुर्डे, संदीप आहिरे, राहुल गांगुर्डे, लखन पगारे, करण सोनवणे, जयेश शेगावकर, वैभव गांगुर्डे, पंकज आहिरे, सागर पटाईत, अनिल खरे, रावसाहेब आहिरे, सागर गुंबाडे आदी उपस्थित होते.

विश्वास सार्थ ठरवू
वंचित बहुजन आघाडीने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल. या माध्यमातून समाजोपयोगी कामे करून गोरगरिबांना न्याय मिळवून देईल.
– विकी गांगुर्डे, शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पिंपळगाव बसवंत