लॉकडाऊनच्या धास्तीने १२ रुपये गायछाप
पिंपळगाव बसवंत – गेल्यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर राज्यभर लॉकडाउन लागू झाल्यापासून अमलीपदार्थांची विक्री पूर्णपणे बंद असल्याकारणाने तंबाखू खाणाऱ्यांची थु, थु मात्र काही अंशी थांबली होती. सध्यस्थीतीत नाशिक जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्बंध कडक करण्यात आले. वाढती रुग्णसंख्या बघता प्रशासनाकडून येत्या काळात लॉकडाउन जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहरात सर्वाधिक खप असलेल्या गायछाप तंबाखुचा दुकानातील साठा काही अंशी संपत चालल्याने शिल्लक असलेल्या मालाचे दर वाढले आहे. शहरात १० रुपयांची गायछाप १२ रुपयांना विक्री होत असल्याने येत्या काळात लॉकडाउन लागू झाल्यास गायछाप तंबाखूची पाच पट दराने विक्री होत गायछापला सोन्याचा भाव मिळणार यात शंका नाही.
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने देशभरात १४ एप्रिलपर्यन्त लागू केलेला लॉकडाऊन ३ मे २०२० पर्यंत वाढविल्याने अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित प्रतिष्ठाने बंदच आहे. त्यातही संचारबंदीत दारू अमली पदार्थ विक्री करण्यास पूर्णता बंदी घातल्याने राज्यात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली होती.,राज्यासह नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक खप असलेली १० रुपयांची तंबाखू बंद काळात गतवर्षी तब्बल ५०रुपयांना विक्री झाली.
मात्र यंदाचा मार्च महिना सुरू होताच नाशिक जिल्ह्यात कोरोनचा रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यात जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहरात गायछाप तंबाखुचा पुन्हा तुटवडा जाणवू लागल्याने शहरात १० रुपयांची गायछाप १२ रुपयांना विक्री करण्याची नामुष्की व्यवसायिकांवर ओढवली आहे. जिल्ह्यात येत्या काळात कडक लॉकडाउन जाहीर झाल्यास येत्या काळात गायछापचे दर पाच पटीने वाढत ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
कुरकुरे घेण्याची अट
शहरातील होलसेल व्यापाऱ्यांकडून किरकोळ दुकान व्यवसायिकांना गायछापविक्री करताना गायछाप तंबाखुच्या एका पाकिटासोबत कुरकुऱ्याचे १० पाकीट विक्रीस दिले जात असल्याने यामुळे नफा निघण्यास अडचण होत आहे.
१२ रुपयांने विक्री
शहरात गायछापवर छापील किंमत १० रुपये असताना काही दुकान दारांकडून कोरोना व लॉकडाउन धास्तीने गायछापची १२रुपयांना विक्री होत आहे. येत्या काळात लॉकडाउन लागू झाल्यास हेच दर पाचपटीने वाढत ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.