शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव बसवंत येथे क.का. वाघ महाविद्यालयात समाजदिन उत्साहात साजरा

by India Darpan
ऑगस्ट 19, 2020 | 9:03 am
in स्थानिक बातम्या
0
DSC 1876 scaled

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही – डॉ.पी.एस.पवार

पिंपळगाव बसवंत – देश व समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणव्यवस्था कोलमडली तर देशातील व्यवस्था कोसळेल. बदलत्या परिस्थितीत शिक्षकांनी अंतर्मुख होऊन अधिक निष्ठेने ज्ञानदान करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्राचार्य डॉ. पी. एस. पवार यांनी आज येथे केले.
पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात समाजदिन कार्यक्रमात ते बोलत होते. मविप्रचे सभापती माणिकतात्या बोरस्ते अध्यक्षस्थानी होते. वरिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वासराव मोरे, व्यावसायिक समितीचे अध्यक्ष उल्हासराव मोरे, प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे, दत्तोपंत आथरे, भीमराव मोरे, पुंडलिक निरगुडे, भास्कर रसाळ, भरत दाते, राजेंद्र निरगुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य दिलीप शिंदे यांनी प्रास्तविक करताना महाविद्यालय तसेच संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख मांडला. तसेच कर्मवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
प्रतिकूल परिस्थितीत सर्वस्व अर्पण करुन मविप्रची मुहूर्तमेढ रोवणा-या कर्मवीरांच्या स्मृती जागवत डॉ. पवार म्हणाले की महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी तळागाळात शिक्षणाचा प्रसार करुन समाजजागृतीचे महान कार्य केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत कर्मवीरांनी तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा नेली. तन-मन-धन अर्पण करुन एका वसतीगृहापासून त्यांनी हे पवित्र कार्य सुरु केले. गेल्या शंभर वर्षात संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. पारंपारिक बरोबरच व्यावसायिक शिक्षणही संस्थेने सुरु केले आहे. समाजात चांगले नेतृत्व, कार्यकर्ते, आदर्श व्यक्ती घडाव्यात हा उद्देश ठेऊन संस्थेच्या घटनेची निर्मिती झाली आहे. आज शिक्षण क्षेत्रात आंतरविरोध वाढला आहे. अनुदानित-विनाअनुदानित तत्वामुळे शिक्षकांच्या प्रेरणेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थीही भरकटला आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांनी अंतर्मुख होऊन अधिक निष्ठेने अध्यापन करुन समाजाचा उत्कर्ष साधावा. नव्या शैक्षणिक धोरणामुळे दर्जेदार शिक्षण, जीवनकौशल्ये, नैतिक मूल्यांना चालना मिळेल अशी आशा आहे.
सभापती माणिकतात्या बोरस्ते म्हणाले की, कर्मवीरांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या त्याग, कार्यापासून प्रेरणा घेत आपल्याला आदर्श पिढ्या व समाज घडवायचा आहे. शिक्षणाची दुरवस्था संपण्यासाठी शासनाने अनुदान वाढवून शिक्षकांना आधार दिला पाहिजे. प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ.एस. एन. अहिरे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणाचा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

Next Post

असा असावा वाढदिवस – मुलाने दिली वडिलांना ऑक्सिजन पार्कची भेट

Next Post
IMG 20200819 WA0008

असा असावा वाढदिवस - मुलाने दिली वडिलांना ऑक्सिजन पार्कची भेट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांचा १० लाखाच्या ऐवजावर डल्ला…वडाळा पाथर्डी मार्गावरील घटना

मे 9, 2025
GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011