पिंपळगाव बसवंत – उज्वल गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सोहनलालजी भंडारी यांच्या कल्पनेतून पिंपळगाव बसवंत येथे ग्रामपलीक सदस्य गणेश बनकर यांच्या हस्ते कबुतरखाना भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. पिंपळगाव कांदा व्यापारी असोसिएशन आणि अमावस्या गोशाळा ग्रुप यांच्या सहकार्याने पिंपळगाव येथे पाच सहा लाख रुपये खर्चून कबुतरखाना उभारण्यात येणार आहे त्यात अंदाजे एक हजार कबुतरांची सोय होणार आहे.यावेळी पिंपळगाव कांदा व्यापारी सोहनलाल भंडारी, विजय बाफना,सुरेश पारख,अतुल शहा,भवरीलाल बागरेचा,किशोर ठक्कर ,शीतल बुरकुले आदींसह नागरिक उपस्थित होते .