पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नुतन सभासद नोंदणीस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित मंगळवार १६ रोजी प्रारंभ झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने १४ तारखेपासून राज्यभर पक्षातर्फे सदस्य नोंदणीची सुरुवात झाली आहे,
मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश गोसावी यांनी सांगितले की, केवळ गप्पा ठोकून पक्ष विस्तार होणार नाही. त्यामुळे निफाड तालुक्यातील नागरिकांनी, मित्र परिवाराने आपण सर्व जण या नोंदणीत सामील करून मुख्य प्रवाहात आणणे जरुरी आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण पूर्ण ताकदीने उतरणार असल्याने मनसेचे जास्तीत जास्त सभासदांनी नोंदणी करण्याचे आवाहन आम्ही केले आहे.
सदस्य नोंदणीप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष प्रकाश गोसावी, मनसे निफाड तालुका विधानसभा अध्यक्ष शिवमुती खडके, म.न.वि.से निफाड विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे, भोलाराम बर्डे, रोशन गायकवाड दिपक मेधने, अजिंक्य वडघुले, मनविसे शहराध्यक्ष नितेश झुटे, आकाश काठे, आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.