पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव २२ एप्रिलपासून ते २४ एप्रिलपर्यंत तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.
पिंपळगाव बसवंत शहरात कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील कांदा व्यापारी असोसिएशनच्या मागणीनुसार पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव २२एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच येत्या २६ एप्रिलपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू राहणार आहे.