पिंपळगाव बसवंत – आशिया खंडात नावलौकिक असलेल्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये शेतकरी हित जपले जात असले तरी काही महाभाग या बाजार समितीला बदनाम करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शुक्रवारी (२३) आपल्या टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या शेतक-यास आडतदाराकडून मारहाण करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार घडला. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रात्री उशिरा संबंधित संशयितांवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र बाळासाहेब जाधव (वय ३७) यांची टोमॅटोची शेती आहे. जाधव यांनी काबाडकष्टातून टोमॅटो पिकविले. तयार झालेला टोमॅटोची विक्री पिंपळगाव बसवंतच्या जोपूळ रोडवरील आणि आशिया खंडात नावाजलेल्या बाजार समितीमध्ये जितेंद्र जाधव करतात. अनेक दिवसांपासून जाधव यांनी विक्री केलेल्या काही मालाची रक्कम सावता माळी आडतकडे बाकी होती. शुक्रवारी जाधव आपल्या मालाचे पैसे घेण्यासाठी गेले असतांना सावता माळी आडतदार किशोर दत्तू विधाते व ज्ञानेश्वर दत्तू विधाते यांनी जाधव यांना जबर मारहाण केली. त्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार रामदास गांगुर्डे, बाळकृष्ण नाठे पुढील तपास करीत आहे.
ही गुंडगिरी किती दिवस चालणार?
कोरोनाच्या काळात विद्यमान आमदारांचे अपयश जनतेसमोर आले नाही. परंतु, हे किती दिवस चालणार? २४ तासांच्या आत शेतक-यांना पैसे देण्याचा नियम असताना आठ आठ दिवस उशिर करण्याचे कारण काय?
भास्कर बनकर, शिवसेना नेते, पिंपळगाव बसवंत

आडतदारांकडून नेहमीच अडवणूक
माझ्या टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी गेलो असताना संत सावता माळी आडतमधील दोघांनी मला शिवीगाळ करीत मारहाण केली. शेतकर्यांना नेहमीच आडतदारांकडून त्रास दिला जातो.
– जितेंद्र जाधव, शेतकरी, कारसूळ
माझ्या टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी गेलो असताना संत सावता माळी आडतमधील दोघांनी मला शिवीगाळ करीत मारहाण केली. शेतकर्यांना नेहमीच आडतदारांकडून त्रास दिला जातो.
– जितेंद्र जाधव, शेतकरी, कारसूळ
एकाधिकारशाही मोडीत काढावी*
आशिया खंडात पिंपळगाव बाजार समितीचा गवगवा केला जातो. आरश्याला लाजवेल अशी बाजार समिती बनवली. परंतु, याठिकाणी माझ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून व आडत्यांकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसेल तर ही एकाधिकारशाही सभापतिंनी मोडीत काढून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. यापुढे असे प्रकार घडू नये, हीच अपेक्षा.
– देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ
– देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ
बाजार समितीचा फतवा आदेश
विक्री केलेल्या मालाचे २४ तासांच्या आत पैसे देण्याचे परिपत्रक खुद्द सभापती दिलीप बनकर यांच्या आदेशान्वये व्यापारी आणि आडतदारांना दिले आहे. असे असताना सभापती बनकर यांच्या आदेशाला आडतदार महत्व देत नाही, असा अर्थ घेतला तर वावगे ठरू नये.