पिंपळगाव बसवंत – मुंबई – आग्रा महामार्गावर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास पाचोरा फाट्याजवळील सूर्या हॉटेल समोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुस्वार तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, पायाच्या पंजावरून बसचे चाक गेल्याने पाय फॅक्चर झाला. पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकहून मालेगावच्या दिशेने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या महामंडळाच्या बसने (क्र.एम.एच.०६-एस-८२४०) पाचोरे वणी फाट्यालगत असलेल्या हॉटेल सूर्याजवळील चौफुलीवर वळत असलेल्या पिंपळगाव येथील होंडा कंपनीच्या स्प्लेन्डर दुचाकीला (क्र. एमएच-१५-बीके-८११३) पाठीमागून धडक दिली. त्यात मोटारसायकलस्वार शंकर अशोक गायकवाड (२०) या तरुणाच्या पायाच्या पंजावरून बसचे चाक गेल्याने पायाचा पंजा फॅक्चर झाला आहे. तसेच, डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच २४ तास मोफत सेवा देणाऱ्या स्वामी नरेंद्रचार्य महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेचे चालक मधुकर गवळी यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणास पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविले. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असला तरी त्याचे प्राण वाचले आहे. मात्र, त्याचा पायाचा पंजा निकामी झाला आहे.

त्याच ठिकाणी सहावा अपघात
परिसरातील पाचोरे वणी लगत असलेल्या सूर्या हॉटेल जवळील चौफुलीवर अपघाताची मालिकाच सुरू आहे. असे असतानादेखील याठिकाणी गतिरोधक बसविलेले नाहीत. आतापर्यंत या ठिकाणी ६ अपघात झाले असून, त्यात दोन जणांना प्राण गमवावे लागले. तर उर्वरित गंभीर दुखापतींमुळे अपंगत्व आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गंभीरपणे घेऊन त्याठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

महामार्गावरील द्राक्षविक्री ठरतेय जीवघेणी
गुरुदत्त हॉटेल ते शिरवाडे फाट्यापर्यंत महामार्गाच्या कडेला अनधिकृतपणे द्राक्षाच्या मंड्या काही व्यावसायिकांनी थाटल्या आहेत. त्यामुळे खरेदीसाठी थांबणारे वाहन थेट महार्गावर उभे राहत असल्याने वाहनांचे छोटे – मोठे अपघात सातत्याने घडत आहे. मात्र, टोल नाका प्रशासन व वाहतूक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अनधिकृत व्यावसायिकांचे फावत आहे.

आईचे छत्र हरपल्यानंतर पाय गमावला
आजाराने आईचे निधन झाल्याने शंकर व त्याच्या दोन बहिणीचे छत्र हरपले होते. आपल्या दोन बहिणीची मोल मजुरी करून जबाबदारी शंकर सांभाळत होता. मात्र, दुसऱ्यांच्या शेतावर मजुरीसाठी जाताना शंकरचा अपघातात होऊन त्यात पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचेच भविष्य अंधारात आले आहे. त्यामुळे बहिणीचा देखील आधार गेला आहे.