पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव शहरात रात्रीच्या दरम्यान धारदार शस्त्र बाळगणाऱ्या सागर सुदाम कुचेकर वय २७ रा.नांदूर शिंगोटे याच्या पिंपळगाव पोलिसांनी ४ रोजी पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेड भागातून मुसक्या आवळीत जेरबंद केले.
पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सागर सुदाम कुचेकर वय २७, रा.नांदूर शिंगोटे, मातंगवाडा ता. सिन्नर हा पिंपळगाव बसवंत शहरात काहीतरी दखलपात्र गुन्हा घडविण्याचा उद्देशाने मोटरसायकलवर धारदार चॅापर घेऊन वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने उंबरखेड भागातील भाऊ नगर परिसरात ४ रोजी रात्रीच्या दरम्यान छापा मारत एक चोपर, एक दुचाकी व एक मोबाईल असा एकूण ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत
आरोपी सागर सुदाम कुचेकर यास पिंपळगाव पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या. याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात हत्यार कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह रत्नाकर बागुल अधिक तपास करीत आहे.
शहरात कॉम्बिग ऑपरेशन सुरू……
शहरातील गुन्हेगारी वस्त्यात रात्रीच्या दरम्यान पिंपळगाव पोलिसांकडून कॉम्बिग ऑपरेशन मोहिमेस प्रारंभ केला आहे.या मोहिमेत शहरातील वाहनांची कसून तपासणी, संशियत गुन्हेगारांच्या तपासण्या, संशियत गुन्हेगारांच्या घराच्या झडत्या सुरू केल्याने शहरातील संशियत गुन्हेगार पिंपळगाव पोलिसांच्या रडावर आले आहे.
पोलिसांकडून आवाहन
पिंपळगाव शहरात द्राक्ष हंगाम जोरात सुरू झाल्याने द्राक्ष उत्पादकांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना खबरदारी घ्यावी, जेणे करून फसवणूक टाळता येईल.तसेच शहरात अनोळखी संशियत इसम आढळून आल्यास तातडीने पिंपळगाव पोलिस ठाण्यास माहिती देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यानी केले.