पिंपळगाव बसवंत – प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रूग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला देणा-या प्रभारी वैद्यकीय अधिका-यास निलंबित करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. तालुका वैद्यकीय अधिका-यांना याबाबत शुक्रवारी निवेदन देण्यात आले.
पिंपळगाव बसवंत शहरातील गोरगरीब नागरिक उपचारासाठी प्राथमिक रुग्णालयात येतात. मात्र, तात्पुरत्या स्वरुपात पदभार दिलेले स्री रोगतज्ज्ञ डॉ. जयेश निकुंभ रूग्णांना आपल्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला देत असल्याचा आरोप रूग्णांनी केला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिपक मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष मेंबर गांगुर्डे, अंकुश वारडे, राहुल सुरडकर, नितीन घुटे, एकनाथ झनकर, दत्ता मोरे, सचिन पारधे, निलेश काकडे आदी उपस्थित होते.

चौकशीचे आदेश दिले आहेत
पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्री रोगतज्ज्ञ डाॅ. जयेश निकुंभ यांच्याविषयी तक्रार प्राप्त झाली आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी चेतन काळे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
– संदीप कराड, गटविकास अधिकारी, निफाड

….
जळगाव, औरंगाबाद येथेही तक्रार
डॉ. जयेश निकुंभ यांच्याविरोधात जळगाव, औरंगाबाद येथील रुग्णांच्याही तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे संबंधीत डॉक्टरच्या पिंपळगाव शहरातील खासगी रुग्णालयाची देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.