पिंपळगाव बसवंत – जनावरास (पशुधन) ओळख निर्माण व्हावी, या हेतूने टॅगिंग, लाळ खुरकत लसीकरण व ऑनलाईन प्रणाली ही योजना केंद्र सरकारने संपूर्ण देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातही सदर मोहीम राबविण्यात येत आहे. ही योजना केवळ तीन दिवसांत पुर्णपणे यशस्वी करीत राज्यात प्रथम येण्याचा मान निफाड तालुक्यातील दावचवाडी पशुवैद्यकीय दवाखान्याने मिळवला आहे.
महाराष्ट्र पशुसंवर्धनचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. सुधाकर शिरसाठ, नाशिकचे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बाबुराव नरवाडे, नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे व पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात हे काम प्रगतीपथावर सुरु आहे. निफाड पंचायत समितीचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त (पाॅलिक्लिनिक) डॉ. रवींद्र चांदोरे, निफाड पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ.सुनील आहिरे यांनी त्यासाठी वेगाने अमलबजावणी केली. निफाड तालुक्यातील दावचवाडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – २ च्या अधिका-यांनी वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केले. फक्त तीन दिवसांत शेतक-यांच्या घरी जाऊन १६०० जनावरांना टॅगिंग, लाळ खुरकत लसीकरण व ऑनलाईन प्रणालीत नोंद केली. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान दावचवाडी गावाला मिळाला आहे. या दवाखान्याच्या हद्दीत दावचवाडी, कारसूळ, रौळस, पिंप्री या गावांचा समावेश असून, डॉ. राजेंद्र केदार, प्रकाश निखाडे व त्यांच्या टीमने मेहनतीने प्रत्येकाच्या मळ्यात, खळ्यात, चिखलात जाऊन ३ दिवसात ही मोहीम यशस्वी राबविली. आली आहे. एकूण १६०० पशुधनांना नवी ओळख मिळाली आहे. तसेच टॅगिंग, लसीकरण व ऑनलाईन प्रणालीमध्ये टॅग नंबर जोडणे, जनावरांचे वय, वेत, दुभती जनावरे, गाभण, पशुमालकाचे नाव, पशुमालकाचे आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबरची ऑनलाईन नोंद केली जात आहे.
सदर योजना यशस्वी करण्यासाठी डॉ.नामदेव नामेवार, डॉ.अजिंक्य चव्हाण, डॉ.रामदास कुयटे, डॉ.अनिल कापसे, डॉ.प्रवीण शिंदे, डॉ. जगदीश गुंजाळ, डॉ.शुभम म्हस्कर, डॉ.किरण खरात, डॉ.वैभव शिंदे, डॉ.पंकज कुयटे, डॉ.अरुण जाधव, डॉ.विश्वास कर्डेल, डॉ.राधाकृष्ण सांगळे, डॉ.किरण वाघ, डॉ.सोमनाथ वाघ, डॉ.संतोष दिघे, डॉ.दिगंबर वाघ, डॉ.मोहन चांदोरे यांचे सहकार्य लाभले..
राज्यात दावचवाडी गावाची प्रथम निवड
नाशिक जिल्हा परिषदचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – २ दावचवाडीचे डॉ. राजेंद्र केदार व सर्व टीमने शेतकरी बांधवांच्या मळ्यात, खळ्यात व चिखलात जाऊन हे सर्व काम ३ दिवसात पूर्ण केले. त्यांच्या या कामाची दखल घेत राज्यात दावचवाडी गावाची प्रथम निवड केली आहे.
– बाबुराव नरवाडे, नाशिक पशुसंवर्धन उपआयुक्त
– बाबुराव नरवाडे, नाशिक पशुसंवर्धन उपआयुक्त
सहकार्यांच्या मदतीनेच पल्ला पूर्ण
पशुसंवर्धनच्या वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सूचनांचे पालन करीत सदर योजना यशस्वी केली. हे यश माझे एकट्याचे नसून, सहकार्यांच्या मदतीनेच आपण हा पल्ला पूर्ण केला.
– डाॅ. राजेंद्र केदार, पशुवैद्यकीय अधिकारी, दावचवाडी
– डाॅ. राजेंद्र केदार, पशुवैद्यकीय अधिकारी, दावचवाडी