पिंपळगाव बसवंत- निफाड तालुक्यातील “द्राक्षपंढरी” बुधवारी (दि. २१) झालेल्या तुफान पावसामुळे हादरली. तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने शेतक-यांसमोर नवे संकट उभे केले असून, फुलोरा आणि टोपणातील बागा धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी झालेल्या पावसामुळे पिंपळगाव बसवंत शहरासह परिसरातील काही गावे सहा तासांहून अधिक काळ अंधारात होती. अखेर रानवड फिडरचा बिघाड दुरूस्त न झाल्याने पिंपळस फिडरवरून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरत आहे. पिंपळगाव बसवंत परिसरात बुधवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे द्राक्षबागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. दरम्यान, दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या पावसामुळे पिंपळगाव परिसरातील छोट्या-मोठ्या नाल्यांना पाणी आले होते. या पावसामुळे फुलोरा आणि टोपणातील द्राक्ष बागांचे नुकसान होणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पिंपळगाव बसवंत परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पिंपळगाव बसवंत शहराला वीज पुरवठा करणा-या रानवड फिडरमध्ये बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी पिंपळगाव महावितरणचे २० कर्मचारी सतत प्रयत्नशील होते. मात्र, त्यात यशा आले नाही. अखेर, पिंपळस (रामाचे) येथील फिडरमधून पिंपळगाव शहराला वीज पुरवठा करण्यात आला.
पिंपळगावचा वीज पुरवठा सहा तास खंडित
बुधवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने पिंपळगाव बसवंत शहराला वीज पुरवठा करणा-या “रानवड फिडर”मध्ये बिघाड झाला. त्यामुळे पिंपळगाव शहरासह परिसरातील काही गावे सहा तासांहून अधिक काळ अंधारात होती. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
तांत्रिक अडचण लक्षात आल्यानंतर युद्ध पातळीवर वीज पुरवठा सुरळीत
बुधवारी दुपारी दोन वाजता मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात विजांचा कडकडाट मोठा होता. त्यामुळे पिंपळगाव बसवंत शहराला वीज पुरवठा करणा-या रानवड फिडरमध्ये बिघाड झाला. अनेक वेळानंतर तांत्रिक अडचण लक्षात आल्यानंतर युद्ध पातळीवर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, त्यात यश न आल्याने शेवटी पिंपळस (रामाचे) येथील फिडरमधून पिंपळगाव शहराला वीज पुरवठा करण्यात आला.
– एकनाथ कापसे, मुख्य अभियंता, महावितरण, पिंपळगाव बसवंत
– एकनाथ कापसे, मुख्य अभियंता, महावितरण, पिंपळगाव बसवंत
द्राक्ष बागांचे नुकसान होणार
अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल. बुधवारी झालेल्या पावसामुळे फुलोरा आणि टोपणातील द्राक्ष बागांचे नुकसान होणार आहे.
– देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ
– देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ