पिंपळगाव बसवंत’: शहरात गेल्या काही दिवसांपासून मंदावलेली कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पिंपळगाव बसवंत ग्रामपालिका, महसूल, व पोलीस प्रशासनाकडून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० व्यावसायिकांवर धडक कारवाई करत दुकानांना सील ठोकले. त्यांच्याकडून ३० हजारांचा दंड वसुल करण्यात आला.
कोरोना विषाणूपासून बचाव व खबरदारी म्हणून पिंपळगाव शहर परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रतिष्ठाने शनिवार, रविवार पूर्णता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशन्वये पिंपळगाव ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले असताना शहरात, शनिवार, रविवार चोरी, छुपी प्रतिष्ठाने उघडी ठेवणाऱ्या, व शटर बंद करुन आत काम चालू ठेवणा-या व्यवसायिकांवर ग्रामपालिका, पोलीस प्रशासन, व महसूल प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यात १० दुकानावर ३० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाई प्रसंगी ग्रामपालिकेचे ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, मंडल अधिकारी नीलकंठ उगले आदिंसह आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.
पिंपळगावकराना आवाहन









