पिंपळगाव बसवंत -द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत व परीसरात सध्या द्राक्ष हंगाम तेजीत सुरू झाला आहे. त्यातच उन्हाची त्रिवता वाढल्याने गाराव्यासाठी द्राक्ष बागेवर सापांचा वावर वाढला असून द्राक्ष उत्पादकांना सापांच्या दर्शनाने धास्ती मात्र पुरती धडकी भरल्याने द्राक्ष बागेत वावरताना द्राक्ष उत्पादकांनी काळजी घेण्याचे आवाहन सर्प मित्रांकडून करण्यात आले आहे.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात द्राक्ष बागेतील गारवा व बाहेरील उन्हाचा तडाखा या मुळे शेतकरी मित्र असलेला साप हा द्राक्ष बागांतील गारवा मुळे बहुतांशी द्राक्ष बागात दिसुन येत असुन द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्ग नी बागात जातांना काळजी पुर्वक बघुन जावे शक्यतो पायात बुट तसेच डोक्यावर टोपी व रात्रीच्या वेळेस बॅटरी चा वापर करावा साप विषारी असल्यास जवळील सर्प मित्रांना फोन बोलावून घ्यावे असे आवाहन वन्य जीव रक्षकांनी केले आहे
विषारी साप असल्यास त्वरित सर्प मित्रांना बोलवावे
शेतकरी वर्गानी बागेत शिरतांना वेलीवर नजर टाकावी कारण द्राक्ष हंगामात सर्प चावण्याच्या घटना घडत असतात विषारी साप असल्यास त्वरित सर्प मित्रांना बोलुन घ्यावे
चेतन बस्ते ,अंतरवेली, निफाड
…