पिंपळगाव बसवंत – नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजातील मतिमंद मुलीवर अत्याचार करणा-या नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बहुजन रयत परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. परिषदेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष संजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. १२) निफाड तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजातील मतिमंद मुलीवर अत्याचार करून खुन करणा-या नराधमांवर राज्य शासनाने कठोरात कठोर कारवाई करून कुटुंबियांना न्याय द्यावा, तसेच राज्य सरकारने कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करीत बहुजन रयत परिषदेच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
निवेदनावर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव, राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव थाटशृंगार, महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र पाटील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष संजय शिरसाठ, निफाड तालुका संघटक शंकर बंद्रे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख किशोर साळवे, उप जिल्हाध्यक्ष गजानन पगारे, नाशिक शहराध्यक्ष राजाभाऊ थोरात, जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप खरात, निफाड तालुका संपर्क प्रमुख अंबादास जाधव, सामाजिक कार्यकर्ते शरद निरभवणे, केदू शिरसाठ, किरण साबळे, ज्ञानेश्वर निरभवणे, जिल्हा सरचिटणीस महेश बकुरे, चांदवड तालुका युवक अध्यक्ष महेश बत्तीसे आदींची स्वाक्षरी आहेत.