पिंपळगाव बसवंत: नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी, नाशिक यांनी अंशत: लॉकडाऊनची घोषणा करत विविध अटी व शर्ती जाहीर केल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असून या अंशत: घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरीवर्ग पुन्हा एकदा मागील वर्षीच्या लॉकडाऊनसारखा सुलतानी संकटात सापडला जाण्याची भीती शेतकरी व व्यापारी वर्गामध्ये निर्माण झालेली असल्याने निफाड तालुक्यासह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी घाबरून न जाता व अफवांवर विश्वास न ठेवता सुरळीत द्राक्षविक्री करण्याचे आवाहन निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी केले.
निफाड तालुक्यातील गतवर्षीच्या आसमानी संकटाचा सामना करतांना द्राक्षउत्पादकांचा जिव मेटाकुटिस आला आहे काहि दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे त्यातच आता पुन्हा हे कोरोनाचे संकट नव्याने येऊ पाहत असल्याने द्राक्षउत्पादकांना हवीहवीशी द्राक्षशेती आता नकोशी वाटायला लागली आहे उत्पादन खर्चही जर हातात येत नसेल तर उत्पादकांनी हि शेती कशी करायची हा प्रश्न उत्पादकांना पडला याकरीता प्रशासनाशी झालेल्या चर्चनुसार द्राक्षपिक विक्रीबाबत काहिहि अडचण नसल्याने उत्पादकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपले द्राक्ष विक्री करावे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नयेत. द्राक्ष खरेदी-विक्रीवर याचा कोणताही परिणाम होणार नाहीत. आपला द्राक्ष शेतीमाल सुरळीतपणे विक्री करावा. असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी केले आहे.