पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील चार द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना १६ लाखांचा चुना लावण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा पाच व्यापा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरवाडे वणी येथील शेतकरी लक्ष्मण पंढरीनाथ निफाडे यांची ७ लाख ४१ हजार रूपयांची फसवणूक व्यापा-यांनी केली आहे. याप्रकरणी निफाडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नाईम राहेणी (रा. अमरोहा, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुस-या घटनेत पालखेड मिरची येथील शेतकरी सुरेश घेवरचंद लोढा यांची २ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक व्यापा-याने केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी संतोष भाऊसाहेब सांगळे (रा. उगाव, ता. निफाड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोकणगाव (ता. निफाड) येथील शेतकरी चेतन साहेबराव मोरे यांची ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भोलानाथ सोनी, मोहम्मद फारूख (दोन्ही रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, चौथ्या घटनेत साकोरे (मिग) येथील शेतकरी प्रभात तुकाराम जाधव यांची ३ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी राहुल सुभाष गुंजाळ (रा. निफाड रोड, पिंपळगाव बसवंत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश चौधरी, युवराज सैंदाणे आदी तपास करीत आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश चौधरी, युवराज सैंदाणे आदी तपास करीत आहे.