पिंपळगाव बसवंत: मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव शिवारातील शनी मंदिर परिसरात गुरुवार .१८ मार्च रोजी नाशिककडून पिंपळगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रक बस व कारच्या तिहेरी अपघातात बागलाण तालुक्यातील पोलीस खात्यात नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक असलेल्या पोलीस कुटुंबातील १८ वर्षीय मयुरी पंडित चौरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसऱ्या दिवशी १९ मार्च रोजी अपघातात गंभीर जखमी असलेल्या माय लेकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चौरे पोलीस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अन्य पोलीस वडिलांसह चालक जखमीवर उपचार सुरू आहे.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील महामार्गावरील कोकणगाव शिवारातील शनी मंदिर परिसरात फेल झालेला ट्रक बस व कारच्या तिहेरी अपघाताची घटना गुरुवारी दुपारी घडली होती. या अपघातात पोलीस कुटुंबातील १८ वर्षीय मयुरी पंडित चौरे हीचा जागेवर मृत्यू झाला. तर दुसऱ्या दिवशी २६ रोजी अपघातात गंभीर जखमी असलेल्या वैशाली पंडित चौरे, वय ३१, सागर पंडित चौरे वय २२, या मायलेकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला झाल्याने चौरे पोलीस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातातील जखमी पोलिस हवालदार पंडित बाबुराव चौरे, वय ४७, चालक संजय एन बागुल वय ४२ रा. यांच्यावर उपचार सुरू आहे.
पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षण भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एकनाथ पवार, पो. कॅा. दीपक निकुंभ आदी तपास करत आहे.
तर अपघात टाळता आला असता !
अपघात घटना स्थळावरून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळगाव टोलनाका प्रशासनाने महामार्गावर पहिल्या लेनवर नादुरुस्त असलेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे प्रसंगावधान दाखवले असले तर कदाचित ही अपघाताची घटना निश्चितच टाळता आली असती. पिंपळगाव टोलनाका केवळ कर वसुलीसाठी असून मात्र महामार्गावरील वाहनधारकांना टोलबाबतीत अन्य कुठल्याही सुविधा टोलनाका प्रशासनाकडून मिळत नसल्याची ओरड वाहन धारकांकडून ऐकावयास मिळत आहे.