पिंपळगाव बसवंत – पिंपळगाव बसवंत राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वरील ३८०.०० किमी ते ४४०.००किमी पट्यातील पिंपळगाव नाशिक गोंदे विभाग या रस्त्यासाठी पिंपळगाव पीएनजी टोल नाल्यावर वाढीव ५ टक्के टोल दरवाढ रविवार दि १ एप्रिल २०२१ पासून ते ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू करण्यात येणार असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येणारी रस्त्यासह उड्डाणपुलाची कामे अपूर्ण असताना टोलचा वाढीव भुर्दंड का ? व कोणत्या निकषांच्या आधारावर टोल वे कंपनी कडून टोलची दरवाढ केली जात असल्याचा संतप्त सवाल देखील वाहन धारकांकडून विचारला जात आहे
१ एप्रिल २०२१ पासून छोट्या वाहनांसाठी ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर अवजड वाहनांसाठी १० ते १५ रूपयांची घसघशीत वाढ करण्यात आली असल्याने वाहन धरकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. टोल वे कंपनीच्या वतीने वाहन धरकांकडून वसुली केली जाते मग त्या प्रमाणात नागरिकांना टोलनाक्या संदर्भातील सर्व सुविधाही दिल्या गेल्या पाहिजे यामध्ये क्रेन ऍम्ब्युलन्स आदींसह मेंटेनन्स विभागाच्या सुविधाही मिळणे तितकेच गरजेचे आहे.
गोंदे ते पिंपळगाव बसवंत महामार्गाचे सहा पदरीकरण झाल्यानंतर पीएनजी टोलवे कंपनी कडून चार ते पाच वर्षापासून टोल वसुली सुरूच आहे मात्र कोकणगाव, ओझर परिसरातील उड्डाणपूल व सर्व्हिस रोडचे काम अद्यापही अपूर्णच असल्याने परिसरात अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे मात्र महामार्ग प्राधिकरण व टोल अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून मात्र टोलवसुली जोरदार सुरु आहे
……….जुने दर……
तपशील २०१७ २०१८ २०१९ २०२०
कार, जीप, व्हॅन १३० १३५ १४० १४५
मिनी बस २१० २१५ २२० २३५
बस ट्रक ४३५ ४५५ ४७५ ४९०
3 अँक्सल ४७५ ४९५ ५१५ ५३५
4 ते 6 अँक्सल ६८५ ७१५ ७४५ ७७०
7 अँक्सल। ८३७ ८७० ९०५ ९४०
………………………… ……..
नवीन लागू दर- २०२१ ते मार्च २०२२
कार, जीप, व्हॅन १५०
मिनी बस २४५
बस ट्रक ५१०
3 अँक्सल ५५५
4 ते 6 अँक्सल ८००
7 अँक्सल ९७५
…………
स्थानिकांनाही लागणार टोल?
टोलनाक्याच्या २०किमी परिसरात राहणाऱ्या स्थानिकांच्या सर्व अव्यवसायिक वाहनांसाठी प्रत्येक महिन्याला १ एप्रिल पासून २८५ रुपये भरून मासिक पास खरेदी करावा लागण्याचा फतवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढल्याने याला स्थानिक पिंपळगावकरांनी मात्र पूर्णत विरोध दर्शविला आहे.
…………
नागरिकांना कुठल्याही सुविधा नाही

पिंपळगाव बसवंत परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला जागोजागी पच मारण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे व उड्डाणपुलाचे कामे प्रलंबीत असताना टोल दरवाढ अन्यायकारक असून टोल नाक्यावर वसुली व्यतिरिक्त टोल नाक्या संदर्भात नागरिकांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही.
नितीन बनकर, शहरप्रमुख शिवसेना पिंपळगाव ब
…………………..
टोल नाका कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे









