पिंपळगाव बसवंत: केंद्र सरकारने भारतातील सर्व टोल नाके बंद करून जीपीएस टेक्नॉलॉजी बसवण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतातील लाखो टोल कर्मचारी यांच्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळणार आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून पिंपळगाव बसवंत टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून गांधीगिरीच्या मार्गाने काम सुरू ठेवत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.
पिंपळगाव टोलनाक्यावर जवळपास ३०० हून अधिक महिला वर्गासह कर्मचारी काम करत आहे. मात्र केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा देत देशभरातील सर्व टोलनाके जीपीएस टेक्नॉलॉजीला जोडण्याचा निर्णय घेतल्याने देशभरातील टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचा-यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याने याचा जाहीर निषेध म्हणून पिंपळगाव टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम सुरू ठेवत केंद्र सरकारचा गांधीगिरीच्या मार्गाने निषेध नोंदविला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटना सरचिटणीस अजय लोढा, कार्याअध्यक्ष रामेश्वर भावसार, सहसचिव सुधीर डांगळे, तुषार साळवे, सुवर्णा बोरसे, मीनाक्षी गांगुर्डे, रूबिना शहा, भाग्यश्री उघडे, प्रमीला चव्हाण, मुक्ता ठाकरे, कविता साबळे, रामनाथ गव्हाणे, राकेश चौधरी, भरत मांदळे, संपत कडाळे, आदीसह कामगार बंधू, भगिनीं उपस्थित होत्या.
जोरदार घोषणाबाजी…..
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध असो, भारत माता की जय, करेंगे काम, काम का लेंगे पुरा दाम आदी जोरदार घोषणाबाजी करत पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर कामगारांनी केंद्र सरकारचा निषेध केला. देशभरातील टोलनाक्यावर जीपीएस टेक्नॉलॉजी बसविण्याचा निर्णयास कामगारांचा विरोध नाही. पण टोलनाका कर्मचारी देखील बेरोजगार होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी केली.
टोल कर्मचारी बेरोजगार होणार नाही याची काळजी घ्यावी
सरकारने डिजिटल इंडिया जरूर करावा पण बेरोजगार इंडियाचा पण विचार करावा आपण हे धोरण (GPS) अवलंबवत असतांना कुठल्याही प्रकारे टोल कर्मचारी बेरोजगार होणार नाही याची काळजी घ्यावी ही विनंती
सुधीर डांगळे, टोलनाका कर्मचारी पिंपळगाव