पिंपळगाव बसवंत: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत येथील २२ कार्यकर्त्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, जिल्हा संघटक संजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थिती पिंपळगाव बसवंत शहरात पक्षप्रवेश केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशनव्ये १४ तारखेपासून राज्यभर पक्षातर्फे सदस्य नोंदणीची सुरवात झाली आहे, केवळ गप्पा ठोकून पक्ष विस्तार होणार नाही. त्यामुळे निफाड तालुक्यातील नागरिकांनी, मित्र परिवाराने आपण सर्व जण या नोंदणीत सामील करून मुख्य प्रवाहात आणणे जरुरी आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरनार असल्याने कार्यकर्त्यांनी जास्तीतजास्त सभासदांनी नोंदणी करत कामाला लागन्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यानी केल्या.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी,नामदेव पाटील, जिल्हा संघटक संजय मोरे, तालुकाध्यक्ष शैलेश शेलार, मनवीसे विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे, शहराध्यक्ष राजेंद्र भवर, उपशहरप्रमुख निलेश सोनवणे, सरचिटणीस निलेश सोनवणे, सतीश पाटील, सुयोग गायकवाड, लखन कोपरे, संतोष पाटील, अनिकेत आथरे, योगेश पाटील, देविदास सनधान, अक्षय गवळी, विजय चव्हाण, राहुल चौधरी, रामदास भालेराव आदी उपस्थित होते.
मनसेचा झंझावात निर्माण करणार
निफाड तालुक्यातील सभासद नोंदणी व जाहीर प्रवेश पक्षप्रवेशास दिमाखात प्रारंभ झाला आहे. मनसेची तालुक्यातुन जास्तीत जास्त सभासद नोंदणी कशी होईल यासाठी प्रयलयत्न आहे. गाव तिथे, मनसेची शाखा व शाखा तिथे सभासद करून निफाड तालुक्यात मनसेचा झंझावात निर्माण करणार आहे.
संजय मोरे, जिल्हा संघटक मनसे