आमदार दिलीप बनकर यांनी दिली माहिती
पिंपळगाव बसवंत: जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ग्रामपंचायतीना जन सुविधा साठी विशेष अनुदान योजना राबविण्यात येते या योजने अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातील सुमारे २३० ग्रामपंचायतीच्या कामांना प्रसाकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी मी सुचवलेल्या कामांना सुमारे १ कोटी २० लाख रुपयाच्या कामांना मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे
यामध्ये ओणे येथे दशक्रिया शेड बांधणे १० लाख, महाजनपूर येथे दशक्रिया शेड बांधणे १० लाख, गोरठाण येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणे १० लाख, नांदुर्डी येथे स्मशानभूमीत निवारा शेड बांधकाम करणे १० लाख, नारायणटेंभी येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणे १० लाख, बेहेड येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणे १० लाख, पिंपळस येथे दशक्रियाविधी शेड बांधणे २० लाख, नैताळे येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणे १० लाख, वावी येथे दशक्रियाविधी शेड बांधणे १० लाख, शिंपीटाकळी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे २० लाख आदी कामांचा समावेश आहे. ही कामे मंजूर केल्याबद्दल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ याचे आमदार दिलीप बनकर यांनी आभार मानले.