पिंपळगाव बसवंत: भारतीय जनता पार्टीचे लासलगाव मंडळ अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांच्यावर थेटाळे येथील फार्म हाऊस येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा पिंपळगाव बसवंत शहर भाजपच्या वतीने जाहीर निषेध नोंदवीत सदर हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शहर भाजपच्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदन देतांना भाजपचे जिल्हा चिटणीस सतीश मोरे,भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अल्पेश पारख, शहर अध्यक्ष गोविंद कुशारे, दत्तात्रय काळे, प्रशांत घोडके, आदी उपस्थित होते.