पिंपळगाव बसवंत: बेलापूर, श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करून झालेल्या हत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पिंपळगाव बसवंत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील पोलीस ठाण्यास निवेदन देऊन करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर जिल्हा श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करून झालेल्या हत्येमुळे जैन समाज बांधवात संतापाचे वातावरण पसरले आहे. या हत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी .
यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अल्पेश पारख, शहर अध्यक्ष गोविंद कुशारे, दत्तू काळे, बापूसाहेब पाटील, मनोज मुथा, प्रमोद भटेवरा, राजेंद्र सोनी, सुभाष धाडीवाल, उमेश ढेपले, महेश गांधी, मदन घुमरे, अमित संकलेचा आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.