महागाईचा भडका;दर पोहचले ८५०पर्यंत
पिंपळगाव बसवंत: स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील ८ कोटी गरीब गरजू महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस उपलब्ध करुन देत महिलांच्या चेह-यावर हास्य फुलवले असले तरी सध्यस्थीतीत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता ह्याच गॅस टाक्यांच्या दरात चालू आर्थिक वर्षात भरमसाठ वाढ झाल्याने मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या महिलांना महिना काठी ८५० पर्यंत रुपये भरून गॅस टाकी खरेदी करणे आवाक्या बाहेर गेल्याने ग्रामीण भागातील ‘उज्वला’ गॅस दरवाढीमुळे चुलीकडे वळाल्या असल्याचे वास्तव चित्र नाकारून चालणार नाही.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पांरपारिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना गोर गरीब, गरजू कुटुंबासाठी राबविली. प्रारंभी महिलांचे सक्षमीकरण तर झालेच, त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास थांबविण्यात ही योजना यशस्वी ठरली असली या वर्षी गॅसचे दर ८५० पर्यंत येऊन ठेपल्याने ते सर्वसामान्य, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील घेणे परवडत नसल्याचे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या पाचोरे वणी, बेहेड, नारायण टेंभी, आहेरगाव, गोरठाण, पालखेड मिरची सह अन्य ग्रामीण भागात गॅ च्या भरमसाठ महागाईमुळे पारंपरिक पद्धतीने चूल पेटवण्याची वेळ महिलावर ओढावल्याने गृहिणी वर्गात नाराजीचा सुर पहावयास मिळत आहे.
वस्त्यात पुन्हा चुली पेटवू लागल्या

केंद्र शासनाने प्रारंभी उज्वला योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविली.तेव्हा गॅसचे दरही आवाक्यात असल्याने मोलमजुरी करणारे कुटुंब देखील गॅसचा वापर करू लागले.मात्र चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने गॅसच्या दरात भरमसाठ दरवाढ केल्याने ग्रामीण भागात आदिवासी वस्त्यात पुन्हा चुली पेटवू लागल्या आहे.
सुलभा पवार, पं. स. सदस्य सुकेणे गण
चुली पेटवण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही










