पिंपळगाव बसवंत: शहरात वाढत्या कोरोना बधितांची संख्या बघता पिंपळगाव बसवंत येथील कोविड सेंटरला निफाडचे माजी आमदार अनिल कदमयांनी भेट देत पाहणी केली.निफाड तालुक्यातील वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता अनिल कदम यांनी ऑक्सिजन बेडची, कोविड सेंटर मध्ये दिल्या जाणारे सुविधांची माहीती घेत रुग्णांना तातडीने सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी रुग्णांची आपुलकीने विचारपूस केली.आरोग्या संदर्भात कुठलीही समस्या असल्यास माझ्याशी व माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा असे आवाहन माजी आमदार अनिल कदम यावेळी केले. यावेळी डॉक्टर रोहन मोरे,पिंपळगाव कृ.उ.बाजार समिती संचालक गोकुळ गिते व कर्मचारी उपस्थित होते.