पिंपळगाव बसवंत: गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरात पुन्हा कोरोनाने थैमान घातले आहे. शहरात कोरोनाची दुसरी लाट सुपर स्प्रेडर ठरत असल्याने उपचाराअभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याने येथील कोविड सेंटरमध्ये सध्यस्थीतीत १०० विना ऑक्सिजन बेडची व्यवस्था तर उपजिल्हा रुग्णालयात ४० ऑक्सिजनच्या बेडची व्यवस्था आहे. मात्र वाढती रुग्णसंख्या बघता ऑक्सिजन, बेड अपुरे ठरत असल्याने रुग्णाचे हाल पे हाल सुरू असल्याने प्रशासनाने पिंपळगाव कोविड सेंटरला वाढीव ऑक्सिजनची बेडची व्यवस्था करण्याची सध्यातरी गरज आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात निफाड तालुक्यात वाढती कोरोना बाधितांची संख्या ही लक्षणीय आहे. दररोज वाढणारे रुग्ण संख्या बघता सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटलच्या बेड संख्येत मर्यादा येत आहे. आजच्या परिस्थितीत ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी असून त्या क्षमतेत बेड उपलब्ध होत नाही.
तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात मार्च महिन्याच्या प्रारंभीपासून कोरोनाने चांगलीच दहशत माजवली आहे.दिवसाकाठी शहरात १५ ते २० कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन पुरते धास्तावले आहे. पिंपळगाव कोविड सेंटरमध्ये १०६ तर सिद्धिविनायक कोविड सेंटरमध्ये
५६ रुग्ण उपचार घेत आहे. मात्र रुग्णांना पाहिजे त्या पटीत ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रशासनाने अतिरिक्त ऑक्सिजन बेडची व्यवस्था करणे काळजी गरज बनली आहे.
……
विनाऑक्सिजन बेड उपलब्ध
पिंपळगाव बसवंत कोविड सेंटरमध्ये १०० विना ऑक्सिजनचे बेड आहे.त्यापैकी ४०हुन अधिक बेड उपलब्ध आहेत. मात्र समोर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात ४०ऑक्सिजनचे बेड सध्यस्थीतीत असून ते पूर्णपणे फुल झाल्याने झाल्याने ऑक्सिजनचे वाढीव बेड सध्यातरी प्रशासनाने वाढविण्याची गरज आहे.
…..
लाखोंची बिले वसुली
शहरात कोरोनाच्या नावाखाली खाजगी रुग्णालयासह सेंटरकडून रुग्णाकडून लाखोंची बिले वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. कोरोनाची परिस्थिती बघून खाजगी रुग्णालयानी देखील रुग्णांना कमी खर्चात सहकार्य करण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.
……