कोरोना रुग्णांचा आढावा : विना मास्क कारवाईच्या सुचना
पिंपळगाव बसवंत: शहरात गेल्या काही दिवसांपासून मंदावलेली कोरोना बधितांची संख्या मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून वाढत असल्याने शहरात प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पिंपळगाव बसवंत शहराला शुक्रवारी भेट घेत शहरातील पिंपळगाव कोविड सेंटर, पिंपळगाव ग्रामीण रुग्णालय, बाजारसमिती, प्राथमिक आरोग्य केंद्रासह वसुंधरा अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कचरा डेपो, शिवाजी नगर गार्डनची पाहणी करत आढावा घेतला.
निफाड तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने सोयी सुविधेचा दृष्टीने पिंपळगाव बसवंत येथील करोना सेंटरची लीना बनसोडे यांनी पाहणी करीत नविन ग्रामीण रुग्णालय व नव्यानेच सुरू करण्यात करोना सेंटरला कर्मचारी कमतरता, तसेच वाढणारी रूग्ण संख्या लक्षात घेता कोविड सेंटरला खाटांची संख्या वाढविण्यात येतील तसेच बाधित रुग्णाना सुविधेबाबत कमतरता भासू देणार नसल्याचे लीना बनसोड यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पिंपळगाव बसवंत शहरातील कन्टमेंड झोनची पहाणी केली. शहरातील वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता कडक नियम करा, ज्या भागात रूग्ण वाढले तो भाग तातडीने सिल करा, जेणेकरून तेथील रूग्ण बाहेर फिरणार नाही, विना मास्क वर कारवाई चालूच ठेवण्याच्या सुचना यावेळी बनसोड यांनी स्थानिक प्रशासनास केल्या. यावेळी आमदार दिलीप बनकर, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ रोहन मोरे, कोविड संपर्क प्रमुख डाॅ.चेतन काळे, डाॅ.राहुल वाघ, पो.नि.भाऊसाहेब पठारे, ऊपसरपंच सुहास मोरे, विश्वास मोरे, सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, बाळासाहेब बनकर ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम. आदि उपस्थित होते.
आमदार बनकरांचे मानले आभार
जि प मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यानी पिंपळगाव बाजार समितीस आमदार दिलीप बनकरांसमवेत भेट दिली. निफाड तालुक्यात कोविड काळात बाजारासमितीने सुरवातीपासून केलेल्या उपाययोजनाबाबत बनसोड यांनी आमदार दिलीप बनकर यांचे आभार मानले.
वसुधरा अंतर्गत कामांची पाहणी
पिंपळगाव ग्रामपालिकेच्या पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन, शिवाजी नगर गार्डनची जि प मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड यानी पाहणी करत ग्रामपालिकेच्या कामाचे कौतुक केले.