पिंपळगाव बसवंत – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने कोरोना व्हायरस स्वॅब संकलन केंद्र पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सोमवार पासून सुरु करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना व्हायरस स्वॅब संकलन करण्यात येणार आहे. सदर चाचणी केवळ ११०० रुपयांत उपलब्ध होणार आहे. संबंधितांना सोबत आधार कार्डची सत्यप्रत लागणार आहे. परिसरातील कोरोना व्हायरस सदृश्य रुग्णांसाठी ही सुविधा केली आहे. तरी कोरोनाविषयक लक्षणे आढळली तर संबंधितांनी लवकरात लवकर या संकलन केंद्रावर येऊन कोरोना व्हायरसच्या अचूक निदानासाठीची RT-PCR चाचणी करून योग्य ते उपचार करावेत, असे आवाहन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, निफाड तालुका संचालक प्रल्हादराव गडाख, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वासराव मोरे, प्रतापदादा मोरे, उल्हासराव मोरे, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी केले आहे. संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना व्हायरस स्वॅब संकलन केंद्राचे काम सुरू आहे.