पिंपळगाव बसवंत : कांदा निर्यातबंदीवर शिथिलता आणि व्यापा-यांवर फक्त दोनच टन कांदा साठवणुकीचे निर्बंध आणल्याच्या निर्णयानंतर शनिवारी (दि. २४) पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा क्विंटलमागे २२०० रूपयांनी कमी गेल्याने शेतक-यांचा उद्रेक झाला. संतापलेल्या शेतक-यांनी लिलाव बंद पाडत संताप व्यक्त केला. केंद्र सरकारने दोनच दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदीत शिथीलता आणण्याचा निर्णय घेतला. लगोलग व्यापा-यांवर केवळ दोन टन कांदा साठवणुकीच्या निर्णयामुळे दरात शनिवारी २२०० रूपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतक-यांनी सकाळच्या सत्रातील कांदा लिलाव बंद पाडले. शुक्रवारी जास्तीत जास्त ८२८२ रूपये क्विंटल कांदा पुकारला असताना केंद्र सरकारच्या निर्यातबंदी शिथिलतेच्या निर्णयामुळे कांदा दरात घसरण झाली. सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त ६१४०, सरासरी ४७००, तर कमीत कमी २००० रूपयांचा दर मिळाला. यामुळे संतापलेल्या शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, दुपारच्या सत्रात कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, ज्या शेतक-यांना आहे त्या दरात कांदा द्यायचा असेल त्याच शेतक-यांचा कांदा खरेदी करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला. दुपारच्या सत्रात ७२०० रूपयांचा दर मिळाल्याने शेतक-यांना काहीसा दिलासा मिळाला.

शुक्रवारचे दर
कमीत कमी – ३०००, जास्तीत जास्त ८२८२, सरासरी ६९०१.
शनिवारचे दर
सकाळ सत्रात कमीत कमी २०००, सरासरी ४७००, जास्तीत जास्त ६१४०. तर दुपारच्या सत्रात जास्तीत जास्त ७२२१ दर मिळाला.
कमीत कमी – ३०००, जास्तीत जास्त ८२८२, सरासरी ६९०१.
शनिवारचे दर
सकाळ सत्रात कमीत कमी २०००, सरासरी ४७००, जास्तीत जास्त ६१४०. तर दुपारच्या सत्रात जास्तीत जास्त ७२२१ दर मिळाला.