सोमवार, सप्टेंबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पिंपळगाव बसवंत – उपोषणाचे हत्यार उगारताच ८० लाखांचा प्रस्ताव सादर

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 2, 2020 | 11:44 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201002 WA0022

पिंपळगाव बसवंत – निफाड तालुक्यातील कारसूळ येथील जुन्या पालखेड रस्त्याच्या कामासाठी उपोषणाचे हत्यार उगारताच ८० लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच या रस्त्याचे भाग्य उजाळणार आहे.
निफाड तालुक्यातील कारसूळ येथील रस्त्याची अवस्था फार वाईट आहे. त्यातच कारसूळ ते जुना पालखेड रस्ता राज्य मार्ग – २७ ला जोडणारा (जाधव रिसोर्टजवळ निघणारा) रस्ता पावसाळ्यानंतर खराब असायचा. एखादा रूग्ण किंवा अंत्यसंस्कारासाठी मोठी गैरसोय व्हायची. परिणामी, अंत्ययात्रा  स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी तीन गावांची शिव ओलांडण्याची नामुष्की नातेवाईकांवर यायची. तसेच शेतीमाल बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी फार जिकरीचे होते. याबाबत कारसूळचे माजी उपसरपंच देवेंद्र काजळे यांनी रस्त्यांसाठी अनेकदा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला वारंवार पत्र, निवेदने देऊनही कार्यवाही झालेली नाही. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलावलेल्या ३० ऑक्टोबर २०१७ च्या जनता दरबारात तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आश्वासन देऊनही  कार्यवाही झाली नाही. त्यानंतर  १५ डिसेंबर २०१८ च्या उच्च न्यायालयाच्या घटनेच्या आर्टीकल २१ नुसार तसेच रिट पिटीशन नं. ८/२००५ व रिट पिटीशन नं. ३/ २००५ जस्टीस आर.एम.लोढा यांनी नमूद केलेली आहे. सदर रिट पिटीशनचा आधार उच्च न्यायालयाने पी. आय. एल. रिट पिटीशन नं. ७१/२०१३ मध्ये घेऊन महाराष्ट्र शासनाला रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. हे निवेदन मिळताच १५ दिवसांमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सदर रस्त्याबाबत कार्यवाही सुरु करावी किंवा समाधानकारक खुलासा द्यावा, यावरही कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारचा खुलासा झाला नाही. तसेच २० जानेवारी २०२० रोजी पालकमंत्री भुजबळ यांना निवेदन दिल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळाले. पण यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे काजळे यांनी  २ ऑक्टोबर २०२० रोजी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देताच नाशिक जिल्हा परिषद इवद विभाग क्र. ३ नाशिक अंतर्गत जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील अतिरिक्त गट ब सन २०१९ – २०२० विशेष दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत कारसूळ ते जुना पालखेड रस्ता सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ४/०० ग्रामा ३१५ यासाठी ८०.०० लाख रुपयांचा निधी १ कामांना मिळावा, असा प्रस्ताव मंजुरीस्तव ग्रामविकास व जलसंधारण विभागास पाठविल्याची माहिती काजळे यांना जिल्हा परिषद व उपविभाग निफाड यांच्याकडून पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य लवकरच उजाळणार आहे.

कोट
कारसूळ – जुन्या पालखेड रस्त्याच्या कामासाठी उपोषणाचे हत्यार उगारताच या रस्त्यासाठी ८० लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
– देवेंद्र काजळे, माजी उपसरपंच, कारसूळ

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक क्राईम – दोन महिलांचे मंगळसुत्र खेचले, चैनस्नॅचरांचा सुळसुळाट

Next Post

नासाचे हे  शास्त्रज्ञ करणार मार्गदर्शन; आठवडाभर ऑनलाईन सत्र

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना नव्या संधीचे दालन खुले होईल, जाणून घ्या, सोमवार, २२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 21, 2025
IMG 20250921 WA0434 1
स्थानिक बातम्या

संयुक्त राष्ट्र महासभेच्या UNGA80 विज्ञान शिखर परिषदेत एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले देशाचे प्रतिनिधित्व

सप्टेंबर 21, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला फसवणुकीच्या प्रकरणात सुनावली ४ वर्षांची शिक्षा…

सप्टेंबर 21, 2025
bullete train
महत्त्वाच्या बातम्या

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा केव्हा पूर्ण होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली ही माहिती

सप्टेंबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी रुपयांचा निधी…

सप्टेंबर 21, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

भारतीय शिष्टमंडळ या तारखेला अमेरिकेला भेट देणार…या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 21, 2025
G1Sin8kW4AAjERO e1758416853507
मुख्य बातमी

दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर…असा आहे प्रवास

सप्टेंबर 21, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणीची मंत्रालयातून गंभीर दखल, गुन्हा दाखल, तिघांना अटक

सप्टेंबर 21, 2025
Next Post
space e1601365064985

नासाचे हे  शास्त्रज्ञ करणार मार्गदर्शन; आठवडाभर ऑनलाईन सत्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011