पिंपळगाव बसवंत: कोरोना सारख्या भयावय परिस्थिती रुग्णांना ऑक्सिजनचा भासत असलेला तुटवडा लक्षात घेता निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नातून ३५ लक्ष रुपये निधीतून पिंपळगाव बसवंत येथील उपजिल्हा रुग्णालयात येत्या काही दिवसात ऑक्सिजन लवकरच ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येणार असल्याची माहिती निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिली. या ऑक्सिजन प्रकल्पाच्यामाध्यमातून कोविड रुग्णांना मुबकल प्रमाणात प्राणवायू मिळणार आहे.
निफाड तालुक्यातीलसह पिंपळगाव बसवंत शहरात कोरोना बधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्ध होत नसल्याने हीच बाब हेरून निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी ३५ लक्ष रूपये निधीतून येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची लवकरच ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यान्वितचे काम सुरू करण्यात आले आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून रोज एक हजार क्यूबिक ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.या माध्यमातून पिंपळगाव कोविड सेंटरसह खाजगी रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज पूर्ण होणार आहे.
लवकरच ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यान्वित होणार
कोरोना महामारीत रुग्णांना ऑक्सिजनचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेता येथील उपजिल्हा रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यान्वित करण्यात येणार आहे. जगण्या मरण्याच्या लढतीत सदैव जनतेसोबत आहे.
दिलीप बनकर, आमदार निफाड
…………….
स्व खर्चातून कोविड सेंटर
कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी जीवनदान देऊ शकणारे कोविड सेंटर येथील येत्या ५ दिवसात शहरातील जोपूळ रोड परिसरात सुरू होणार आहे. आमदार दिलीप बनकर यांच्या भीमाशंकर इंग्लिश मिडीयम शाळेत स्व खर्चाने ६५ ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरचे काम प्रगतीपथावर सुरू असून लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी हे खुले होणार आहे.