पिंपळगाव बसवंत – जिल्ह्यातील कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत
सोमवारी (दि.१९) उन्हाळ कांद्याने आठ हजारांचा टप्पा ओलांडला. चालू वर्षातील उच्चांकी ८१०१ प्रति क्विंटकप्रमाणे दर मिळाला. शनिवारच्या तुलनेत सोमवारी कांदा दर १०५० रुपयांनी वधारल्याने उत्पादकांना दिलासा लाभला.
सोमवारी (दि.१९) उन्हाळ कांद्याने आठ हजारांचा टप्पा ओलांडला. चालू वर्षातील उच्चांकी ८१०१ प्रति क्विंटकप्रमाणे दर मिळाला. शनिवारच्या तुलनेत सोमवारी कांदा दर १०५० रुपयांनी वधारल्याने उत्पादकांना दिलासा लाभला.
केंद्र सरकारकडून कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्यात बंदी केली. मात्र, परराज्यात अतिवृष्टीमुळे कांद्याचे ४० टक्के नुकसान झाले. परिणामी, कांदा आवक घटल्याने पिंपळगाव बाजार समितीत कांदा बाजारभाव ३५०० ते ७००० च्या दरम्यान स्थिर आहे. शिवाय बाजार समितीत आता लाल कांद्याची आवक हळू हळू वधारती असल्याने लाल कांद्याला किफायतशीर दर लाभत आहे. सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ३५००, सरासरी सरी ६७७५, तर जास्तीत जास्त ७९५१ रुपयांचा दर मिळाला. तर, दुपारच्या सत्रात कमीत कमी ३५०१, सरासरी सरी ६७७५, तर जास्तीत जास्त ८१०१ रुपयांचा दर मिळाला. लाल कांद्याला सोमवारी कमीत कमी २००१, सरासरी ४५०१, तर जास्तीत जास्त ६२०१ रुपयांचा दर मिळाला.
आवक घटल्याने चढे दर
पिंपळगाव बाजार समितीत येणाऱ्या उन्हाळ कांद्याच्या आवकेत कमालीची घट झाल्याने निर्यातबंदी लादूनदेखील उन्हाळ कांद्याला चढे भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा लाभत आहे.