ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्र घेऊन निफाड पंचायत समिती येथील कृषी अधिकारी महेश नागपूरकर यांच्याशी संपर्क साधावा लागेल. या योजनेत शेतकऱ्यांना नविन विहीर बांधणे (दोन लाख पन्नास हजार रुपये), जुनी विहीर दुरूस्त करणे (पन्नास हजार रुपये), इनवेल बोअरिंग करणे (वीस हजार रुपये), वीज जोडणी आकार (दहा हजार रुपये), शेततळ्यांचे प्लॉस्टिक अस्तरीकरण करणे (एक लाख रुपये), सुक्ष्म सिंचन संचामध्ये ठिबक सिंचन (पन्नास हजार रुपये), तुषार सिंचन बसविणे (पंचविस हजार रुपये), पारस बाग करणे (पाचशे रुपये), पंपसंच (डिजेल/विद्युत) विस हजार रुपये, १० अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या पंपसंचाकरीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार १०० टक्के अनुदान देय राहिल.
पीव्हीसी/एचडीपीई पाईपसाठी तीस हजार (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजुर असलेल्या मापदंडानुसार किमतीच्या १०० किंवा उच्चतम मर्यादा रुपये तीस हजार रुपये)
१) या योजनेत अंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती व शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण यापैकी एका घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ देता येईल. नवीन विहीर व जुनी विहीर दुरूस्ती या घटकाचा यापुर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच (डिझेल/विद्युत), पीव्हीसी, एचडीपीई पाईप व परस बाग या घटकांचा लाभ अनुज्ञेय राहील.
२) योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज घेण्यात येतील. ग्रामसभेने शिफारस केलेल्या शेतकऱ्यांमधील इच्छूक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज/प्रस्ताव निफाड पंचायत समितीत कृषी अधिकारी महेश नागपूरकर यांच्याकडे प्रस्तावाची मुळ प्रत आवश्यक कागदपत्रांसह जमा करावी.
• लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असला पाहिजे.
• शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
• शेतकऱ्यांच्या नावे जमीन धारणेचा ७/१२ दाखला व ८ अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
• लाभार्थ्याकडे स्वत:चे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
• लाभार्थ्याचे स्वत:चे राष्ट्रीय बॅंकेत खाते असणे आवश्यक व आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
• शेतकऱ्यांकडे तहसिलदारांचा दीड लाख रुपयांच्या आतील उत्पन्नाचा दाखला पाहिजे.
• शेतकऱ्याकडे ०.४० हेक्टर ते ६ हेक्टरपर्यंत क्षेत्र असावे.
*योजनेचा लाभ घ्यावा*
अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना लागू केली आहे. सदर योजना निफाड पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– संदीप कराड, गटविकास अधिकारी, निफाड पंचायत समिती
……
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना फायदेशीर
निफाड तालुक्यातील व पालखेड गटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना फायदेशीर आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा करुन घ्यावा. द्राक्षबागा, फळबागा व भाजीपाला अशी पिके घेतले जातील.
– देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ