शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव बसवंत – आदिवासी शक्ती सेनेकडून वीज बिलांची होळी

by India Darpan
सप्टेंबर 4, 2020 | 11:44 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200904 WA0018

पिंपळगाव बसवंत – महावितरण विभागाला वीज बिल माफ करा, यासंदर्भात निवेदन देऊनही कोणतीच दखल घेतली नसल्याने पिंपळगाव बसवंतसह परिसरात ठिकठिकाणी वीज बिलाची होळी करण्यात आली. वीज बिल माफ करा, अन्यथा खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत आदिवासी शक्ती सेनच्या वतीने शुक्रवारी  आंदोलन करून महावितरण विभागाचा निषेध नोंदविण्यात आला.
लॉकडाऊन काळात चार महिने काम धंदे बंद होते. मजुरीची देखील वणवण निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने व उसनवारीवर घेतलेल्या पैशात दोन वेळचे जेवण कोरोना काळात मिळत असताना महावितरण विभागाने वाढीव लाईट बिलाचा शॉक दिलाआहे. दर महिन्याला येणारे बिल देखील वाढीव येत आहे. त्यामुळे  मजूर व मागासलेल्या बांधवांच्या  डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर झाला आहे. हा डोंगर न पेलवणारा असल्याने वीज बिल तत्काळ माफ करावे, अन्यथा येणारे कोणतेच वीज बिल भरणार नसल्याचे सांगत आदिवासी शक्ती सेनेच्या माध्यमातून  पिंपळगाव, मुखेड, नारायण टेंभी व कारसूळ आदी ठिकाणी वीज बिलांची होळी करण्यात आली.
यावेळी आदिवासी शक्ती सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रभाकर फसाळे, माजी सरपंच व रामकृष्ण कंक, तालुकाध्यक्ष दत्तू झनकर, तानाजी पवार, दत्तू वागळे, खंडू सापटे, लक्ष्मण पावजी, सचिन रौंदळ, सुनील वागळे, सुनील पवार, नामदेव चौधरी, अंबादास चौधरी, विशाल पवार, लखन कंक, सविता सताळे, शोभा सताळे, शरद गायकवाड, भाऊसाहेब नेहरे, सूरज सूर्यवंशी, सागर शिंगाडे, युवराज चोथवे, हरी रोकडे, मनोज पवार, लक्ष्मण पवार, ऋषिकेश मोगल आदींसह समाज बांधव, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
–

दरमहिन्याला करु होळी – प्रभाकर फसाळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, आदिवासी शक्ती सेना

महावितरण विभागाला वेळोवेळी वाढीव वीज बिलांसंदर्भात निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला ठिकाणी वीज बिलाची होळी करावी लागली. यापुढे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन वीजबिल माफ करावे, अन्यथा दरमहिन्याला येणाऱ्या वीज बिलांची अशीच होळी केली जाईल.

आमच्या कडे कोणताही निर्णय नाही – एकनाथ कापसे, मुख्य अभियंता, महावितरण विभाग
वीज बिल माफ करणे हा राज्य शासनाचा निर्णय असून अद्यापही आमच्याकडे कोणताही निर्णय आला नसल्याने वीज ग्राहकांना इतर काही समस्या असेल तर त्या सोडवण्याचे काम आम्ही करू.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘अंतिम’ परीक्षांसाठी हे आहेत ३ पर्याय

Next Post

असा आहे चांदवडचा किल्ला

Next Post
IMG 20200904 WA0021

असा आहे चांदवडचा किल्ला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011