पिंपळगाव बसवंत : गेल्या वर्षी कोरोनाचा सर्वत्र प्रकोप झाल्याने लॉकडाउन काळात सर्वसामान्यांचे तर हाल झालेच शिवाय मंदिरे पूर्णतः बंद असल्याने मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या माकडांची उपासमार होऊ नये यासाठी पिंपळगाव बसवंतहून माकडांची फळ अन्न पाण्याची सोय करणाऱ्या सोमेश्वर मोरे यांच्या कार्याची जाणीव ठेवत एका माकडाने चक्क सोमेश्वर मोरे यांच्या आईच्या दहाव्याच्या कार्यक्रमात हजेरी लावत
सोमेश्वर मोरे यांनी लॉकडाउन काळात माकडांसाठी केलेल्या कार्याची जाणीव ठेवली. गेल्यावर्षी कोरोनचा प्रसार झपाट्याने वाढल्याने प्रशासनाकडून नाशिक जिल्ह्यातील कडक लॉकडाउन लागू केला.सर्वत्र मंदिर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आल्याने यात सर्वसामान्यांचे तर हाल झालेच शिवाय मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या मुक्या प्राण्यांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. हीच बाब हेरून जिल्हा प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन सोमेश्वर मोरे व सहकाऱ्यांनी पिंपळगाव बसवंत शहरातून वणी गडावर असलेल्या माकडांची नियमित फळे, अन्न पाण्याची व्यवस्था करत मुक्या प्राण्यांपती भूतदया जोपासली.त्यांच्याच कार्याची जाण एका माकडाने देखील ठेवली आहे. सोमेश्वर मोरे यांच्या आईच्या दहाव्याच्या कार्यक्रम चक्क एक माकडाने हजेरी लावली. जवळपास अर्धातास आईच्या फोटो जवळ बसून मोरे यांनी माकडांप्रति केलेल्या कार्याची जणू साक्षच दिली.