नाशिक – पिंपळगाव बसवंत जवळील महामार्ग पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस निरीक्षकासह पोलिस नाईकावर लाच घेत असल्याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) ही कारवाई केली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील ट्रान्सपोर्टच्या ३५ गाड्या नाशिक ते पिंपळगाव असे वाहतूक करतात. या गाड्यांवर कुठलीही कारवाई करु नये यासाठी सहायक पोलिस निरीक्षक वर्षा कदम आणि पोलिस नाईक उमेश भास्कर सानप यांनी ट्रान्सपोर्टरकडे ८ हजार रुपयांची लाच मागितली. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. ठरल्यानुसार कदम आणि सानप यांनी लाच स्विकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एसीबीचे पथक करीत आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. त्यामुळे याप्रकरणी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.