पिंपळगाव बसवंत -ऑलिम्पिक वर्षातील जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ऑलिम्पिक सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इंग्लंडचा रेहन टेलर विजेता ठरला. या स्पर्धेत इंग्लंड, जपान, पाकिस्तान, नेपाळ, आयर्लंड इत्यादी देशातील तसेच भारतातील २९ घटकराज्ये आणि केंद्र्शाशित प्रेदेशातील ऑलिम्पिक प्रेमींनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी पैकी अचूक उत्तरे देणाऱ्या १० विजेत्यांची निवड करण्यात आली. ते विजेते पुढीलप्रमाणे
१.रेहन टेलर (इंग्लंड ),
२.कुमारी.तैजूम हरपण आली (कर्नाटक),
३.डॉ. बिपीन दास (केरळ),
४.झहूर अहमद (जम्मू काश्मीर ),
५.डॉ. नरेंद्र कुंदर (महाराष्ट्र),
६.कुमारी.सोम्बी बाला देवी (मणिपूर)
७. पुल्ली रामकृष्णा (तेलंगण),
८. एस.पनेरू (नेपाळ),
९.राकेश रालीया (राजस्थान),
१०.श्रीजित पी.ए.(केरळ).
विजेत्यांना त्यांचे पारितोषिक महाविद्यालयाच्या वतीने भारतीय डाक सेवेमार्फत पाठविण्यात येणार आहे. सर्व सहभागीना ऑनलाईन माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात आले.या स्पर्धेसाठी क्रीडा संचालक प्रा. हेमंत पाटील, यांच्या सोबत प्रा. भगवान कडलग, प्रा. डॉ. नरेंद्र पाटील, प्रा. अमोल मेहेंदळे, किशोर न्याहारकर, प्रा.सोमनाथ वानखेडे यांचे सहकार्य लाभले.
विजेत्यांचे आभिंदन मविप्र सरचिटणीस श्रीमती निलीमा पवार,जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, निफाड तालुका संचालक प्रल्हाद गडाख, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वास मोरे, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे,उपप्राचार्य डॉ. एस.एन.अहिरे, उपप्राचार्य ज्ञानोबा ढगे यांनी केले.