पिंपळगाव बसवंत- रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका गेल्या साडे चार महिन्यांपासून अपघातात दुरापस्त असल्याने तिचे ना, आरोग्य विभागाला गांभीर्य ना, प्रशासनाला, ऐन कोरोनाच्या भयाण काळात रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्यांने रुग्णांचे हाल होत आहे. कोरोना सुपर स्प्रेडरमध्ये वाढती रुग्णसंख्या, व वाढते मृत्यूचे आकडे पहाता बाधितरुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही.
पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका व कारचा जोरदार अपघात जोपूळरोडवर ३० नोव्हेंबर २०२० रोजी झाला होता. या अपघातात १०८ रुग्णवाहिका वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ती दुरुस्तीसाठी नाशिक येथे रवाना करण्यात आली. मात्र अपघात घडून जवळपास साडे चार महिने उलटून देखील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास १०८रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. सध्या निफाड तालुका कोरोनचा हॉटस्पॉट ठरू पहात असल्याने तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात कोरोनाने भयावय परिस्थिती निर्माण केली आहे. शहरात बाधित व इतर रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न होऊ शकली नाही.ही रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून देण्याची सध्या तरी गरज आहे.
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
गेल्या साडे चार महिन्यांपासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची १०८ रुग्णवाहिका अपघातात दुरापास्त झाल्याने व्हेंटिलेटरवर आहे. येथील आरोग्य विभागाला या रुग्णवाहिकेचे गांभीर्य नसल्याने ती गॅरेजमध्ये धूळखात पडली आहे. पण, त्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे.
.