पिंपळगाव बसवंत: जिल्ह्यातील महत्वाची व्यापारी बाजारपेठ पिंपळगाव बसवंत शहरात गेल्या काही दिवसांपासून मंदावलेली कोरोना बधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशनव्ये पिंपळगाव बसवंत शहरात अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार, रविवार पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन पोलीस प्रशासनासह ग्रामपालिकेकडून करण्यात येऊन देखील शहरात विना मास्क फिरणाऱ्या २२० नागरिकांसह दुचाकी स्वारांवर पिंपळगाव पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येऊन कारवाई करण्यात आली.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात मंदावलेली कोरोना बधितांची संख्या काही अंशी वाढू लागल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हात शनिवार रविवार बंद पार्श्वभूमीवर पिंपळगाव ग्रामपालिकेकडूनही शनिवार रविवार अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र शहरात निफाड फाटा, वणी चौफुली, सह परिसरातील गावात विना मास्क फिरणाऱ्या २२० नागरिकांसह दुचाकीस्वारांवर पिंपळगाव पोलास ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.
कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करा
वीना मास्क व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकासह वाहन धारकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करून करोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे.
भाऊसाहेब पठारे, पोलीस निरीक्षक पिंपळगाव