पिंपळगाव बसवंत: पिंपळगावचा पीएनजी टोलनाका सतत या, ना, त्या कारणाने चर्चेचा विषय ठरत आहे. केंद्र सरकारकडून फास्टॅग प्रणाली बंधनकारक केली असली तरी जिल्ह्यातील नोंदनीधारक स्थानिक वाहनांकडून पिंपळगाव टोलनाक्यावर लोकल टोल आकारणी केली जाते. फास्टॅग रिचार्ज संपलेल्या वाहनांकडून १४०रुपये ऐवजी तब्बल ५९०रुपये टोलवसुली केली जात असल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने पिंपळगाव टोलनाक्यावर फास्टॅगच्या माध्यमातून होणारी लूटमार त्वरित थांबविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संजय मोरे यांनी टोलनाका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. लूटमार न थांबविल्यास शहर मनसेने टोलनाक्यावर आंदोलनासह खळखट्याकचा इशारा निवेदनातून दिला आहे.
या निवेदनात म्हंटले आहे की,पिंपळगाव टोलनाक्यावर केंद्र सरकारकडून फास्टॅग अनिवार्य केल्याने जवळपास ७५टक्के वाहन धारकांनी आपल्या वाहनांना फास्टॅग बसविले. टोलनाक्यावर येणाऱ्या व जाणाऱ्या रिचार्ज संपलेल्या फास्टॅग धारक वाहनांकडून लोकल १४०रुपये ऐवजी तब्बल ५९०रुपये टोल आकारणी केली जात असल्याने सर्वसामान्य वाहन धारकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने फास्टॅगच्या माध्यमातून होणारी लूटमार त्वरित थांबविण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संजय मोरे, सतीश पाटील, उपशहरप्रमुख निलेश सोनवणे, योगेश पाटील, राजू तिडके, आदी उपस्थित होते.
अन्यथा टोलनाक्यावर आंदोलन
पिंपळगाव टोलनाक्यावर फास्टॅग लावलेल्या पण रिचार्ज संपलेल्या वाहनधारकांकडू पिंपळगाव टोलनाक्यावर अव्वाच्या सव्वा टोल आकारणी अन्यायकारक आहे.प्रशासनाने तातडीने याची दखल गंभीर घेत वाहनधारकांची लूटमार तातडीने थांबवाबी अन्यथा टोलनाक्यावर आंदोलन उभारण्यात येईल.
संजय मोरे, जिल्हा संघटक मनसे