पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव ग्रामपालिकेच्या पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जागतिक जलदिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत येथे ग्रामपंचायत मासिक सभेत जल दिनानिमित्त सामूहिक शपथ घेण्यात आली.
ग्रामपालिकेच्या मासिक सभेत जलदिना निमित्त तसेच जलसवर्धन होणेसाठी सभेत भुजल कायद्याची गावी काटेकोर पालन करने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज़ाहीर केलेले पाऊस झेला अभियान गावी राबवीने, नागरीकांमध्ये जल साक्षरता करने, प्रत्येक घरास रेनवाटर हार्वेस्टिंग बंधनकारक करने, खाजगी नळाना वॉटर मीटर बसविणे, १००% ठिबक सिंचन द्वारेच शेती करने, गावी बोअरवेल करणेस बंधी करने, भूपुष्टवरिल पाण्यसोबत भू गर्भतील पाणी हे सार्वजनिक आहे त्यानुसार बंधने घालने, शेती पिकांचे लागवडिचे नियोजन पाणी बचतीच्या दृष्टिने करने, त्यासाठी शेतकरी यांचे मेळावे आयोजित करने. नदीची शुद्धता आणि पावित्र रखण्यासाठी सकारात्मक पावले उचलने या बाबींची ठराव मासिक सभेत मंज़ूर करण्यात येऊन जलदिननिमित्त वरील बाबींची अंबलबजावनी ठोसपणे करनेसाठी सभेत शपथ घेण्यात आली.
यावेळी ग्रामपालिका सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, किरण लभडे, अल्पेश पारख, दीपक विधाते, रामकृष्ण खोडे, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदिंसह पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.