पिंपळगाव बसवंत- पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या अभिनव पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओझोन पार्क गार्डन मध्ये द स्पॅरो वॉल (चिमण्यांची भिंत )ही संकल्पना राबविण्याचा निर्धार ग्रामपालिका पदाधिकाऱ्यांनी जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत करत या उपक्रमाचा शुभारंभ केला.
जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत पिंपळगाव ग्रामपालिकेकडून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गार्डनमध्ये चिमण्यांसाठी दाणा पाण्याची सोय व्हावी व चिमण्यांची संख्या वाढावी, या उदात्त हेतूने चिमण्यांसाठी बर्ड फिडरची व्यवस्था करण्यात येऊन चिमणी वाचवा, चिमणी जगवाचा अनोखा संदेश यावेळी देण्यात आला.
पिंपळगाव ग्रामपालिकेच्या अभिनव उपक्रमातून येत्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओझोन पार्क गार्डन मध्ये द स्पॅरो वॉल (चिमण्यांची भिंत )ही संकल्पना रामबीण्यास येणार असल्याने याचा शुभारंभ सदस्य गणेश बनकर व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. द स्पॅरो वॉल ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्यास शहरात चिमण्यांच्या दाणा पाण्याची सोयीसह चिमण्यांचे ऐन उन्हाळ्यात हक्काच्या घरात पालन पोषण होणार आहे.
यावेळी ग्रामपालिकेचे उपसरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, लक्ष्मण खोडे, अल्पेश पारख, अमी जीवदयाचे संचालक हरेश शहा, बाळा बनकर, दीपक विधाते, शिक्षक अनिल माळी, संदीप बैरागी आदी उपस्थित होते.
अमी जीवदयातर्फे मोफत बर्ड फिडर
चिमणी वाचवा चिमणी जगवाचा अनोखे संदेश देणाऱ्या अमी जीवदयातर्फे बर्ड फिडर ग्रुपचे संचालक हरेश शहा यांच्या वतीने जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत पिंपळगाव बसवंत शहरातील दिवाणी न्यायालय, पिंपळगाव पोलीस स्टेशन, सर्व जिल्हा परिषद शाळांना मोफत बर्ड फिडर मोफत वाटप करण्यात आले. तर गेल्या तीन वर्षात अमी जीवदयातर्फे आत्तापर्यंत लाखो मोफत बर्ड फिडरचे वाटप झाले.