पिंपळगाव बसवंत – शासनाच्या योजनेत हिरारीने सहभाग नोंदविणाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या अभिनव उपक्रमातुन व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या येथील डंपिंग ग्राऊंडवरील प्लास्टिक कचरा विलीगिकरणास शुक्रवार १२पासून प्रारंभ झाला. ग्रामपालिकेच्या अभिनव पुढाकारातून व एचएएलच्या फंडातून कचरा डेपोवरील प्लास्टिक कचरा विलीगिकरणानंतर माती मिश्रित कचऱ्यासह ओल्या कचऱ्याचे बायो मायनिंग होत कचऱ्यापासून खत निर्मितीसह विद्युत व गॅस निर्मिती करणारी, राज्यातील पहिली ग्रामपालिका म्हणून पिंपळगाव शहराची ओळख निर्माण होणारच आहे. शिवाय या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपालिकेच्या उत्पन्नात भर देखील पडणार आहे.
पिंपळगाव बसवंत शहरातील निफाडरोडवरील गेल्या ३० वर्षाहून अधिक काळापासून असलेल्या कचरा डेपोचा प्रलंबित प्रश्न एचएएलच्या माध्यमातून सार्थकी ठरत आहे. निफाडचे आमदार, दिलीप बनकर सरपंच अलका बनकर यांच्या संकल्पनेतून व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत येथील कचरा डेपोच्या प्रश्न निकाली काढण्यासाठी कचरा डेपोवरील कचऱ्यातील प्लास्टिकचे विलगीकरण व त्यावर पुनर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करण्याचे काम सुरू झाल्याने दिवसाकाठी १०टन कचरा वेगळा केला जात आहे. तसेच ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रकिया करून खतासह विद्युत व गॅस निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे.
सदर कामाची पाहणी निफाडचे आमदार दिलीप बनकर, जि प उपमुख्य कार्यकारी अधिकारी इसाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी गादड, उपसरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे, रामकृष्ण खोडे, अल्पेश पारख, बापू कडाळे, राहुल बनकर, दीपक विधाते, दीपक मोरे, अंकुश वारडे, बाळा बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदी उपस्थित होते.
महिलांना रोजगार…..
पिंपळगाव शहरातील कचरा डेपोवर कचरा विलीगीकरणाची कामे सुरू झाल्याने ग्रामपालिकेच्या माध्यमातून शहरातील कचरा वेचणाऱ्या महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे.
कचरा डेपोचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागला
शहराचा गेल्या २५ ते ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कचरा डेपोचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागला आहे. निवडणुकीत दिलेला शब्द या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे समाधान, तर आहेच, शिवाय कचरा विलीगिकरणातुन खत, विद्युत व गॅस निर्मिती होणार असल्याने ही आनंदाची बाब आहे.
गणेश बनकर, सदस्य ग्रामपालिका पिंपळगाव